Video : पिंपरी : एसटीची चाके रूतलेली; दीड कोटीचा फटका

Ballabhnagar Depo
Ballabhnagar Depo

पिंपरी - प्रतिदिन 18 हजार किलोमीटर धावणारी...दिवसाला सहा लाखाचे उत्पन्न मिळवून देणारी "लालपरी' आजच्याघडीला "लॉकडाउन'मध्ये अडकून पडली आहे. गेल्या 28 दिवसाच्या कालावधीत सुमारे 5 लाख 4 हजार किलोमीटर धावणारी बसची चाके जागीच थांबल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराचे दीड कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. परिणामी आधीच तोट्यात असलेले एसटी महामंडळाची चाके अधिकच खोल रूतली आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात राज्य परिवहन महामंडळाचे एकमेव वल्लभनगर प्रमुख आगार आहे. या आगारात एकूण 55 बसगाड्या आहेत. लग्नसराईचा काळ महामंडळाकरिता सुगीचा असतो. मात्र, यंदा कोरोनाने सर्वत्र कहर केल्याने लग्नसोहळे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांनाही जबर फटका बसला आहे. दिवसाला 40 फेऱ्या व्हायच्या. दिवसाला 18 हजार किलोमीटरचा प्रवास होत असल्याने प्रतिकिलोमीटरला 35 रूपये सरासरी उत्पन्न मिळते. सरासरी उत्पन्न पाहिले तर एक प्रतिदिन 6 लाखाचे उत्पन्न मिळायचे. 22 मार्चच्या जनता कर्फ्युपासून ते 18 एप्रिलपर्यंत 5 लाख 4 हजार किलोमीटर धावणारी बसची चाके थांबली आहेत. दरवर्षी सीझनमध्ये हे उत्पन्न 13 लाख झाल्याची नोंद आहे.

गेल्या 28 दिवसापासून 55 गाड्या जागीच थांबून असल्याने एरवी गजबजेल्या आगारात सगळीकडे शुकशुकाट पहायला मिळत आहे. यामुळे प्रतिदिन 18 हजार किलोमीटर धावणाऱ्या गाड्याचा विचार केला तर 5 लाख 4 हजार किलोमीटर चाके धावले असते, तर त्यातून आगाराला दीड ते दोन कोटीचे उत्पन्नही मिळाले असते. सध्या उन्हाळी सुट्टी, गणपतीपुळे, शिंगणापूर सहल, प्रासंगिक करार, यात्रा व इतर माध्यमाद्वारे मिळणारे उत्पन्नदेखील लॉकडाउनमुळे थांबले आहे. तसेच या आगारातून लांबपल्ल्याच्या कोल्हापूर, मुंबई, पनवेल, अहमदनगर या ठिकाणाहून मिळणाऱ्या उत्पन्नालाही फटका बसला आहे. 28 दिवसाचा कालावधी लोटला असून येणाऱ्या 3 मेपर्यंत लॉकडाउन असल्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्न शाश्‍वती देत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

'एसटी महामंडळाच्या बसेस या कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे थांबल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे व आगाराचे मोठे नुकसान झाले आहे. आगाराचे उत्पन्न बुडाले आहे.
- पल्लवी पाटील, वल्लभ नगर आगारप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com