स्नेहभाव जोडू, कोरोनाची साखळी तोडू... घरी राहा सुरक्षित राहा, यासारखे संदेश दिले फोटो शूटच्या साक्षीने

मिलिंद संधान
Monday, 20 April 2020

पिंंपळे गुरव येथील मुकूंद पाटे व त्यांच्या मित्रमैत्रिनींनी एक कोरोनो संबंधित संदेश फोटो पाहिला आणि कोरोणावर सामाजिक संदेश देण्याचे ठरवले. पाटे हे मूळचे जळगाव तालुक्यातील एरंडोलचे. त्यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयातून पुर्ण केले. त्यांनी 1993 वर्षाच्या इयत्ता १० वी च्या माजी विध्यार्थ्यांना व्हाँट्सअपच्या माध्यमातून एकत्र करीत संदेश दिला.

नवी सांगवी (पुणे) - पिंंपळे गुरव येथील मुकूंद पाटे व त्यांच्या मित्रमैत्रिनींनी एक कोरोनो संबंधित संदेश फोटो पाहिला आणि कोरोणावर सामाजिक संदेश देण्याचे ठरवले. पाटे हे मूळचे जळगाव तालुक्यातील एरंडोलचे. त्यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयातून पुर्ण केले. त्यांनी 1993 वर्षाच्या इयत्ता १० वी च्या माजी विध्यार्थ्यांना व्हाँट्सअपच्या माध्यमातून एकत्र करीत संदेश दिला. त्या सर्वांनीही तयारी दाखवित याला दुजोरा दिला आणि सर्वजण तयारीला लागले. आणि त्यातून कोरोणा संबंधी जागृतीचा एक सुंदर मेसेज तयार झाला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रुपअँडमिन पाटे यांनी प्रत्येकाला संदेशातील एक मुळाक्षर दिले आणि प्रत्येकाने ते मोठया पेपर वर रंगवून  त्याचा सेल्फी पाठवायचा असे ठरले. मग काय प्रत्येकाच्या घरातील मुलांसह सर्वच आपापली जबाबदारीची पुर्ण करु लागली. 29 बालमित्र मैत्रीणी की जे देशात परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी होती, ती ह्या उपक्रमामुळे एकत्र आली.

पाटे म्हणाले, लाँकडाऊन कालावाधीत माननीय पंतप्रधान मोदी यांनी दोन कार्यक्रम ठेवले होते आणि त्याला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. लाँकडाऊनच्या कठीण समयी बालमित्रांच्या व्हाट्सअप्प ग्रुप चा अँडमीन या नात्याने यांना काहीतरी उपक्रम देणे जरुरी होते. बीग बाँसच्या घराप्रमाणे आँनलाईन टास्क देऊ हा उपक्रम आंम्ही साकारला. 

व्हाँट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शालेय मित्रमैत्रिनींनी एकत्र येत कोरोणा आजाराविषयी जनजागृती केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stay home stay safe message by photo shoot