Lockdown : पुण्याच्या पेठांमधील गल्लीबोळही ‘सील’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज २५ हून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसांत मृतांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण पेठांच्या भागांत असून, त्यात भवानी पेठेत सर्वाधिक रुग्ण आहेत.

पुणे : पुण्यातील पेठांमध्ये विशेषत: भवानी पेठेत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने या भागातील एकही व्यक्ती दुसऱ्या परिसरात जाणार नाही, याचा बंदोबस्त पोलिसांनी शनिवारी केला. पेठांमधील अंतर्गत रस्त्यांसह छोट्या गल्ल्याही ‘पॅक’ केल्या आहेत. त्यामुळे शिवाजी रस्त्याच्या पलीकडच्या भागांतून येणाऱ्यांचे सर्व मार्ग रोखले आहेत. त्यासाठी ‘बॅरिकेड’चे जाळे विस्तारले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज २५ हून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसांत मृतांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण पेठांच्या भागांत असून, त्यात भवानी पेठेत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे पेठांसह काही भाग ‘सील’ करण्यात आला. त्यापाठोपाठ संचारबंदीही लागू केली. तरीही, पेठांमधील नव्या रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने या परिसरातील लोकांना रोज दोन तास घराबाहेर पडण्याची आणि तेही जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मुभा दिली आहे.

Lockdown : भाडे नाही तर, घर सोडा: मालकांच्या तंबीला विद्यार्थी वैतागले 

दोन तासानंतर दुकानेही बंद केली जात आहेत. या उपायानंतरही गेल्या चार दिवसांत १२० नवे रुग्ण आढळून आले असून, त्यातही पेठांमधील आकडा अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून भवानी पेठ, रास्ता, नाना, मंगळवार, कसबा, बुधवार, शुक्रवार पेठेतील सर्व गल्लीबोळ्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तरीही वाहने बाहेर काढणाऱ्यांवर शनिवारी सायंकाळपासूनच पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: street lane are also sealed in Pune during lockdown

Tags
टॉपिकस