Lockdown : भाडे नाही तर, घर सोडा: मालकांच्या तंबीला विद्यार्थी वैतागले 

The students are worried by owner threat for Leaving house due to rent not paid during lockdown
The students are worried by owner threat for Leaving house due to rent not paid during lockdown

पुणे: 'कोरोना' आणि घर भाड्याचा काही संबंध नाही, बँक डिटेल्स पाठवत आहे, लगेच महिन्याचे भाडे भरा, नाही तर खोली सोडावी लागेल" अशा धमक्या घरमालकांकडून विद्यार्थ्यांना मिळत आहेत. शासनाने आवाहन करूनही घरमालकांकडून पैशाचा तगादा लावल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'कोरोना'मुळे लाॅकडाऊन झाल्याने महाविद्यालय, खासगी क्लास, मेस बंद झाले त्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे सोडून त्यांच्या मुळगावी जावे लागले आहे. लाॅकडाऊन लांबल्याने ते गावाकडून पुण्यात येऊ शकत नाहीत. बहुतांश विद्यार्थी हे  ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील आहेत. मार्केट बंद, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे.

...म्हणून येताहेत शिवभोजन मिळविण्यात अडचणी
कोल्हापूरचा असणारा अजिंक्य चेंडाके म्हणाला, "लाॅकडाऊनमुळे आम्ही रुममधले सर्वजण पुणे सोडून गावाकडे आलो आहेत. घरमालकांनी महिन्याचे भाडे भरा असे सांगितले आहे. सर्वांचीच स्थिती अडचणीची आहे. आम्ही रूममध्ये रहात नाही, त्यामुळे अर्धे भाडे माफ करावे अशी मागणी केली, पण मालक पूर्ण भाडे मागत आहेत. त्यांनी परिस्थिती समजून घ्यावी."

रात्रीचा दिवस करीत ते देताहेत अत्यावश्‍यक सेवा
प्रगती पाटील म्हणाली, "आम्हालाही खर्च आहेत, त्यामुळे मार्च आणि एप्रिलचे भाडे भरा नाही तर रूम सोडा असे सांगत आहेत. आम्ही पैसे भरण्यासाठी तयार आहोत, पण त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. माझ्या मैत्रिणींना देखील त्यांच्या घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावला आहे. "

दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सर्व घरमालकांना उद्देशून पत्र लिहिले आहे, विद्यार्थी शेतकर्यांची मुले आहेत, त्यांच्याकडून घरभाडे घेऊ नये त्यांना तुम्ही सांभाळून घ्या, असे त्यात नमूद केले आहे, तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही याबाबत घरमालकांना भाड्यासाठी तगादा लावू नये असे आवाहन केले आहे, तरीही घरमालकांवर याचा परिणाम झाला नाही. 


म्हणून भाडे कमी घ्या
लाॅकडाऊन काळात विद्यार्थी खोलीत नसल्याने वीज, पाणी यासह इतर सुविधा वापरत नाहीत. घरमालकांनी याचा विचार करून विद्यार्थ्यांना भाड्यामध्ये ५० टक्के तरी सुट दिली पाहिजे. कोरोना मुळे सर्वांचीच स्थिती अवघड आहे याचा विचार करावा असे विद्यार्थ्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com