Coronavirus : कोरोनामुक्त भारतासाठी एकजुटीने साथ द्या - बाळा भेगडे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

कोरोनामुक्त भारतासाठी सर्वांनी एकजुटीने साथ द्या असे आवाहन करत कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी लोणावळ्यात केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेत उपाययोजनांची माहिती घेतली.

लोणावळा - कोरोनामुक्त भारतासाठी सर्वांनी एकजुटीने साथ द्या असे आवाहन करत कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी लोणावळ्यात केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेत उपाययोजनांची माहिती घेतली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी श्री. भेगडे बोलत होते. उद्या (ता.०५) रात्री नऊ वाजता घराच्या बाल्कनीत मेणबत्ती, दिवे, टॉर्च पेटवत सकारात्मक ऊर्जा तयार कोरोनावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला साद द्या असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी यावेळी केले. मावळ तालुक्यातील प्रत्येक रेशनकार्ड धारकला मोफत अन्न धान्य मिळाले पाहिजे असे सांगत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांची उपासमार टाळण्यासाठी त्यांना तात्पुरते रेशन कार्ड देण्याची मागणी त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support unitedly for a coronet free India bala bhegade