डॉक्‍टरांना कोरोनाचे धडे देणाऱ्या ‘शिक्षिका’ !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

डॉ. गौरी असं करतात काम...

  • जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, अन्य कर्मचारी आणि खासगी व सरकारी वैद्यकीय अधिकारी अशा १३ हजारांहून अधिकजणांना कोरोनाबाबतचे प्रशिक्षण दिले. 
  • ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयासोबत सामंजस्य करार करणे.
  • संशयित रुग्णांचे लक्षणानुसार वर्गीकरण करणे, त्यांना रुग्णालयात दाखल करून नोंदी ठेवणे. 
  • प्रशिक्षण आणि संशयित रुग्णांसाठी रुग्णालयाची सुविधा निर्माण करणे.

एखाद्या संशयित रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे कसे ओळखायचे?, सर्दी, खोकला आणि ताप असलेला प्रत्येक रुग्ण हा कोरोना संशयित असतो का, यासह कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठीचे प्रशिक्षण देण्याचे मोठे आव्हान औंध येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरी जाधव-गायकवाड पेलत आहेत. अर्थातच हे प्रशिक्षण ऑनलाइन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या देत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, ग्रामीण भागातील संशयित कोरोना रुग्णांचे तीन स्वतंत्र संवर्गात वर्गीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील कोवीड रुग्णांसाठी औंध येथील जिल्हा रुग्णालय, लवळे येथील सिंबायोसिस रुग्णालय आणि बारामती येथील उपजिल्हा रुग्णालय अशा तीन ठिकाणी उपचाराची सोय केली आहे. डॉ. जाधव या मूळच्या वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण वालचंदनगर येथेच झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातून वैद्यकीय शाखेची पदवी (एम.बी.बी.एस.) पूर्ण केली आहे. पती दीपक गायकवाड हे अभियंता आहेत. मुलगा शिक्षण घेत आहे.

आम्‍हाला अवश्‍य कळवा...
कोरोनाविरोधातील लढाईत अनेक योद्धे आघाडीवर आहेत. त्‍यांची भूमिका वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. अशा अापल्‍या ओळखीतील, पाहण्यातील योद्ध्यांची माहिती, छायाचित्रे, व्‍हिडिओ आमच्यापर्यंत अवश्‍य पोहचवा. आपला संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. 
आम्‍हाला इ-मेल करा. : editor@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher who offers Corona lessons to doctors dr gauri jadhav