पिंपरी : मंडईतील दुकाने सुरू ठेवून गर्दी जमविल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत  पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत काही दुकानदारांनी त्यांची दुकाने उघडी ठेवून गर्दी जमविली. यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली. याप्रकरणी तीन दुकानदारांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत  पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत काही दुकानदारांनी त्यांची दुकाने उघडी ठेवून गर्दी जमविली. यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली. याप्रकरणी तीन दुकानदारांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनील हिरामण कुदळे (वय 32, रा. नवमहाराष्ट्र शाळे जवळ, पिंपरीगाव) महेश बाळासाहेब घरद (वय 32, राहणार वाघेरे कॉलनी, पिंपरी), ज्ञानेश्वर तुकाराम तापकीर (वय 36, राहणार तापकीरवस्ती, वडमुखवाडी, चाऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास तसेच जमाव जमविण्यास बंदी आहे. तरीही आरोपीनी बुधवारी (ता. 15) पहाटे साडेपाच वाजता पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईतील त्यांच्या दुकानासमोर भाजी मंडईतील खरेदीदार व  व्यापारी जमाव जमवून स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी भाजीची विक्री केली. याठिकाणी गर्दी झाल्याने  कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाली. त्यांना दुकाने बंद करण्याबाबत आदेश दिले असतानाही दुकाने सुरूच ठेवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three criminals accused of running a shop in Pimpri Mandai