राज्यात ट्रक वाहतुकीला प्रारंभ; परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांचे स्पष्टीकरण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार अत्यावश्‍यक सेवा आणि मालवाहतुकीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी "सकाळ' शी बोलताना बुधवारी दिली. 

पुणे - केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार अत्यावश्‍यक सेवा आणि मालवाहतुकीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी "सकाळ' शी बोलताना बुधवारी दिली. आंतरराज्य ट्रक वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्व प्रकारची मालवाहतूक सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने नुकत्याच दिल्या आहेत. त्या नुसार माल वाहतूक  टप्याटप्याने सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार महामार्गावरून ट्रक वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील 11 चेकपोस्टवर उभ्या असलेल्या 18 हजार ट्रकची वाहतूक आता सुरू झाली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने  24 मार्च ते 14 एप्रिल दरम्यान 98 हजार माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली आहे. तसेच परराज्यातील माल वाहनांनाही महाराष्ट्रात वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन  आयुक्त कार्यालयातील उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी दिली.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राज्यात कोठेही माल वाहतूक थांबलेली नाही, असेही त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीचा संदर्भ देत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सध्या घरी गेलेल्या ड्रायव्हर्सला कामावर हजर होण्यासाठी ते राहत असलेल्या भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ पास) घ्यावा लागणार आहे. पाससाठी प्रक्रिया कशी असेल, याची माहिती गुरुवारपर्यंत राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त चन्ने यांनी दिल्याचे "इंडियन ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस'चे सदस्य बाबा शिंदे यांनी सांगितले. 
 
राज्य सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन पोलिस पुण्यात करीत आहेत. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत कोणतीही समस्या आलेली नाही. सरकारचे जे आदेश येतील, त्याची अंमलबजावणी होईल. 
-डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck traffic started in the state