वेळ न पाळणाऱ्या अडत्यांचे परवाने निलंबित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासनातर्फे मार्केटयार्डात उपाययोजना केल्या आहेत. बाजारात वेळेच्या मर्यादेसह काही नियम केले आहेत. मात्र, वेळेचे बंधन न पाळणाऱ्या तरकारी विभागातील चार आणि फळ विभागातील एका अडत्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे. तसेच, बाजारात येणाऱ्या २२ टेंपोचे प्रवेश पास जप्त केले असल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

मार्केट यार्ड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासनातर्फे मार्केटयार्डात उपाययोजना केल्या आहेत. बाजारात वेळेच्या मर्यादेसह काही नियम केले आहेत. मात्र, वेळेचे बंधन न पाळणाऱ्या तरकारी विभागातील चार आणि फळ विभागातील एका अडत्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे. तसेच, बाजारात येणाऱ्या २२ टेंपोचे प्रवेश पास जप्त केले असल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशमुख म्हणाले, ‘‘तरकारी विभागातील चार अडत्यांनी गर्दी जमवणे आणि वेळेच्या बंधनाचे उल्लंघन केले आहे. फळ विभागातील अडत्याने मास्कचा वापर न करता गर्दी जमवली. त्यामुळे त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच, २२ टेम्पो चालकांनी चुकीच्या पद्धतीने बाजारात प्रवेश केला. बाजारातून वेळेत बाहेर न पडल्यामुळे टेम्पो चालकांचे गेटपास जप्त केले आहेत. तसेच त्यांना बाजार परिसरात येण्यास बंदी घातली आहे. 

गर्दी कमी करण्यासाठी विविध नियम
कोरोनामुळे मागील आठवड्यापासून बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी विविध नियम तयार केले आहेत. त्यामध्ये तरकारी आणि कांदा-बटाटा विभाग दिवसाआड सुरू ठेवण्यात येत आहे. आदल्या दिवशी रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ पर्यंत शेतीमालाच्या गाड्यांना बाजारात प्रवेश देवून माल उतरवून घेतला जात आहे. तर गाड्या आणि कामगारांना बाहेर काढून ४.३० वाजता आडते आणि व्यापाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. दुपारी १२ वाजता त्या-त्या विभागातील व्यवहार बंद केले जात आहेत. त्यामुळे बाजार घटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

या अडत्यांचे परवाने निलंबित
१. मे. गावडे- काळे आणि कंपनी
२. मे. अनिल शिवराम भुजबळ
३. मे. देशमुख-पवार आणि कंपनी
४. प्रकाश कमलाकर शितोळे अँड ब्रदर्स
५. भांबुर्डे अँड सन्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unpaid timeout adate permits suspended