Coronavirus : कोरोनाच्या चाचणीसाठी गावोगावी जाणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

कसे आहे किट?

  • ‘रिअल टाइम पीसीआर’ नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित  
  • नाकातील द्रवाचा नमुना घेतला जातो
  • काही रसायनांच्या साहाय्याने आरएनए नावाचं न्युक्लीइक ऍसिड बाहेर काढण्यात येतं.
  • आरएनए ची वाढ करून डीएनए विकसित करण्यात येतो
  • रियल टाईम पीसीआर मशीनच्या साहाय्याने कोरोनाची पुष्टी केली जाते.
  • व्यक्तीत लक्षणे दिसण्यापूर्वीच हे निदान करणे शक्य आहे
  • एका किटद्वारे सुमारे १०० रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करता येते.

पुणे - कोरोना विरुद्धची लढाई आम्ही अधिक तीव्र करणार असून, त्यासाठी दररोज ५० हजार कोरोनाचे चाचणी किट्स घेऊन गावोगावी जाणार असल्याचा निर्धार, स्वदेशी बनावटीचे तपासणी किट बनविणाऱ्या 'मायलॅब'चे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. ही कंपनी २०१६ मध्ये स्थापन झाली असून, मॉलेक्युलर डायग्नोस्टिक किट्स बनवण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सहा आठवड्यांच्या विक्रमी वेळेत त्यांनी हे किट विकसित केले आहे. कवाडे म्हणाले,“बाहेरच्या देशातील अनेक कंपन्या ‘हाय–एंड मॉलेक्युलर डायग्नोस्टिक्स’चा वापर करतात आणि भारतातही त्यांच्या विक्रीसाठी प्रयत्न करतात. परंतु, भारतात अनेकांना त्यांच्या किमती परवडत नाहीत. त्यामुळे हे डायग्नोस्टिक्स खूप मर्यादित क्षेत्रातच पोहोचतात. त्यामुळे भारतात परवडेल अशा किंमतीत किट्स बनवून विक्री करण्याच्या हेतूने आम्ही काम सुरू केलं आहे.”  

केंद्र आणि राज्य शासनाकडून आम्हाला संपूर्ण सहकार्य मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, की किटसाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा, त्याची वाहतूक यासह अनेक गोष्टींसाठी लॉकडाउनच्या काळातही शासनाकडून उत्तम सहकार्य मिळत आहे.

शासनाच्या आणि खासगी अशा अनेक लॅबोरेटरीजनी मोठ्या प्रमाणावर किट्सची मागणी केलेली आहे आणि आम्ही त्यानुसार पुरवठा करत आहोत.  आम्ही आतापर्यंत दहा ते बारा हजार किट्स वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसांत दररोज सुमारे ५० हजार किट्सचं उत्पादन करण्याचं आमचं नियोजन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will go to town for the trial of Corona shailendra kawade