महिलांना मेकअपसाठी सोशल मीडियाचा आधार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

सध्या सोशल मीडियावरूनच सौंदर्याच्या टिप्सची देवाण-घेवाण सुरू आहे. घरच्या घरी फेशिअल, पेडिक्‍युअर, मेनिक्‍युअर व वॅक्‍स सुरू केले आहेत. याशिवाय हेअर कट व कलरिंगचेही प्रयोग केले जात आहेत.

पिंपरी - ‘‘काय गं, ब्युटी पार्लर कधी सुरू होणार? केस खूप पांढरे झाले. ब्लिचिंग नाही. आय ब्रो नसल्याने चेहरा विद्रूप झालाय,’’ असे संवाद हल्ली महिलांमध्ये रंगू लागले आहेत. तसेच, घरांघरात ‘‘अहो, सांगा मी कशी दिसते?’’ हा पती-पत्नीमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्‍नही लॉकडाउनमुळे संपुष्टात आला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पार्लर बंद असल्याने नियमित पार्लरचा वापर करणाऱ्या महिला अस्वस्थ आहेत. वैयक्तिक ऑर्डर घेणेही ब्युटी पार्लर चालकांनी बंद केले आहे. महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी पार्लरमध्ये जाणाऱ्या तसेच, घरीच ब्युटीशिअनला बोलावणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. मात्र, सध्या सोशल मीडियावरूनच सौंदर्याच्या टिप्सची देवाण-घेवाण सुरू आहे. घरच्या घरी फेशिअल, पेडिक्‍युअर, मेनिक्‍युअर व वॅक्‍स सुरू केले आहेत. याशिवाय हेअर कट व कलरिंगचेही प्रयोग केले जात आहेत. 

पुण्यातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डीपी, स्टेट्‌स जुनेच 
महिला सोशल मीडियावर दररोज अपडेट असतात. व्हॉट्सॲप डीपी, स्टेट्स ठेवणे तसेच, फेसबुकवरून फोटो शेअर करण्याची आवड असते. मात्र, लॉकडाउनमुळे घराबाहेर पडण्यास वाव नाही. त्यामुळे मेकअपची संधी नसल्याने बहुतांश महिलांनी जुनेच डीपी ठेवणे पसंत केल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women use social media for makeup