Coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; आकडा गेला...

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 मार्च 2020

- महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीये.

पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फटका 177 पेक्षा जास्त देशांना बसला आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. आत्तापर्यंत जगभरात काही लाखांहून अधिक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची लागण झालेल्या 37 रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 97 होती पण आता यामध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर आता कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात कोरोनाचे आणखी 3 रुग्ण आढळले आहे. तर साताऱ्यामध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.

१५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. 15 हजारांहून अधिक रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हा व्हायरस आता वेगानं पसरत असल्याचं समोर आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus infected Peoples are increasing in Maharashtra