esakal | काेराेनावरील इंजेक्शन आलं, पण आपल्याला परवडणार नाही : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

काेराेनावरील इंजेक्शन आलं, पण आपल्याला परवडणार नाही : शरद पवार

काेराेनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. आगामी दाेन महिन्यांत रुग्णांची संख्या वाढेल, अशी चिंता नुकतीच आरोग्य यंत्रणेने व्यक्त केली आहे.

काेराेनावरील इंजेक्शन आलं, पण आपल्याला परवडणार नाही : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : काेराेनावरील इंजेक्शनची किंमत हजाराे रुपयांत असल्याने ते सर्व सामान्यांना परवडेल अशी स्थिती नसल्याने आपल्याला काेराेना साेबतच जगावे लागेल. त्यामुळे आत्मविश्वासनं उभं रहा, काळजी घ्या असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला.
मराठा जात प्रमाणपत्र असे काढा  

रयत शिक्षण संस्थेच्या सभे निमित्त शरद पवार आज (शनिवार) सातारा दौऱ्यावर आले हाेते. पत्रकार परिषदेनंतर अनाैपचारिक चर्चेत ते म्हणाले काेराेनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. आगामी दाेन महिन्यांत रुग्णांची संख्या वाढेल, अशी चिंता नुकतीच आरोग्य यंत्रणेने व्यक्त केली आहे. कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे. पण ते आपल्याला माणसांना परवडणारं नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे हे इंजेक्शन आपल्या देशात तयार हाेत नाही. त्याची किंमत सुमारे 35 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती पवार यांनी दिली. 

दरम्यान ज्यांना जनतेने बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची, अशी उपहासात्मक टीका शरद पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. तर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.

कोरोना लसीची घाई हानिकारक; वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता

शरद पवार म्‍हणाले, देशाच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न राजकारणापलीकडचा  

जनतेने बाजूला केलेल्यांची नोंद कशाला घ्यायची : शरद पवार