Coronavirus : काळजावर दगड ठेवून आई निभावतेय ‘कर्तव्य’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

आम्‍हाला अवश्‍य कळवा...
कोरोनाविरोधातील लढाईत अनेक योद्धे आघाडीवर आहेत. त्‍यांची भूमिका वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. अशा अापल्‍या ओळखीतील, पाहण्यातील योद्ध्यांची माहिती, छायाचित्रे, व्‍हिडिओ आमच्यापर्यंत अवश्‍य पोहचवा. आपला संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. 
आम्‍हाला इ-मेल करा. : editor@esakal.com

आपल्या लहान मुलींना भेटून बरेच दिवस झालेत. त्यांची आठवण येते, म्हणून फोनवरुन बोलणे होते; परंतु मायेची गळाभेट मात्र होत नाही. मुलींना भेटायचे आहे, कुटुंबीयांसमवेत आपल्या हक्काच्या घरात रहायचे आहे. पण, मायेपेक्षा कर्तव्य मोठं म्हणून काळजावर दगड ठेवून ही ‘माय’ कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या आरोग्य सेवेचे कर्तव्य बजावत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माधवी जगताप भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी असलेल्या स्वतंत्र वॉर्डमध्ये  नर्सिंग इन्चार्ज म्हणून काम पाहत आहेत. सध्या त्या सर्वांनाच साद देत आहेत, ‘‘आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम सज्ज आहोत. दिवसरात्र मेहनत करत आहोत. पुणेकरांनो, काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. घराबाहेर पडू नका. पोलिस, डॉक्टर यांना सहकार्य करा आणि कोरोनाचा संसर्ग रोखा.’’ 

गेल्या दोन वर्षांपासून जगताप या येथे काम करत आहेत. टिंगरेनगरमध्ये राहणाऱ्या जगताप सध्या भारती हॉस्पिटलमधील परिचारिकांच्या वसतिगृहात राहत आहेत. त्यामुळे आपल्या लहान मुलींना (१० आणि १२ वर्षाच्या) भेटणे त्यांना अशक्य होत आहे.

‘कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डमधील परिचारिकांची राहण्याची सोय वसतिगृहात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही तिथेच राहत आहोत. पंधरा दिवस काम आणि पंधरा दिवस वसतिगृहात मुक्काम असे आमचे वेळापत्रक आहे. कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड असून त्यात चार गटात प्रत्येकी ३० कर्मचारी काम करत आहेत,’’ असे जगताप यांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या वॉर्डमध्ये एकदा पीपीई किट घातले की ते ड्यूटी संपल्याशिवाय काढता येत नाही.

कामाचे स्वरूप

  • कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देणे
  • वॉर्डमध्ये लागणाऱ्या वस्तुंची सोय पहाणे- परिचारिकांना प्रोत्साहन देणे
  • रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचारी समुपदेशन करणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: story madhavi jagtap