पुण्यात भाज्यांचे दर घसरले; सर्वसामान्यांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

आठवडाभराच्या लॉकडाउनमुळे शहरात फळभाज्या आणि पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे किलोच्या दरात 20 ते 40 रूपयाने तर पालेभाज्यांच्या गड्डीच्या दरात 10 ते 20 रूपयाने वाढ झाली होती.

मार्केट यार्ड -  सात दिवसानंतर मार्केट यार्ड सुरू झाले. त्यामुळे भाव वाढ झालेल्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव कमी झाले. आठवडाभराच्या लॉकडाउनमुळे शहरात फळभाज्या आणि पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे किलोच्या दरात 20 ते 40 रूपयाने तर पालेभाज्यांच्या गड्डीच्या दरात 10 ते 20 रूपयाने वाढ झाली होती. परंतु मंगळवारपासून बाजार सुरू झाल्याने भाज्यांचे वाढलेले दरही घटले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

मंगळवारी भाजीपाला विभागात 411 गाड्यांतून 6 हजार 435 क्विंटल मालाची आवक झाली. फळ विभागात 141 गाड्यांतून 2 हजार 492 क्विंटल, कांदा-बटाटा विभागात 125 गाड्यांतून 9 हजार 25 क्विंटल मालाची आवक झाली. इतर वेळी भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ विभागात 700 गाड्यांची आवक होते. मंगळवारीही 600 ते 700 गाड्यांची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक समाधानकारक झाल्याने भाव टिकून होते. तसेच शहरात यामुळे मुबलक भाजीपाला उपलब्ध झाला असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा प्रशासनाच्या कडक लॉकडाऊनमुळे मार्केटयार्डातील मुख्य बाजारासह मांजरी, उत्तमनगर, खडकी आणि मोशी येथील उपबाजारही बंद होता. त्यामुळे आठवडाभर शेतकऱ्यांनाही शहरात शेतीमाल घेवून येता आला नाही. भाज्यांच्या दरात घट झाली असल्याची माहिती किरकोळ भाजी विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

किरकोळ बाजारातील भाज्यांचे किलोचे दर 
भाजी - लॉकडाउनमधील दर - मंगळवारचे दर 

बटाटे - 50 रूपये - 40 रूपये 
कांदा - 40 रूपये - 30 रूपये 
शेवगा - 120 रूपये - 70 रूपये 
मटार - 150 रूपये - 100 रूपये 
दोडका - 100 रूपये - 70 रूपये 
भेंडी - 100 रूपये - 80 रूपये 
गवार - 100 रूपये - 80 रूपये 
फ्लॉवर - 80 रूपये - 50 रूपये 
कोबी - 80 रूपये - 50 रूपये 
दूधी भोपळा - 80 रूपये - 50 रूपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable prices fall in Pune

Tags
टॉपिकस
Topic Tags: