#NepalvsNetherlands शेवटच्या चेंडूवर नेपाळचा नाट्यमय विजय

वृत्तसंस्था
Saturday, 4 August 2018

नेपाळ आणि नेदरलॅंड यांच्यातील दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात नेपाळने फक्त एका धावेने विजय मिळवला आहे. हा नेपाळचा एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला विजय आहे. 

अॅमस्टेल्विन : नेपाळ आणि नेदरलॅंड यांच्यातील दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात नेपाळने फक्त एका धावेने विजय मिळवला आहे. हा नेपाळचा एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला विजय आहे. 

 

नेदरलॅंड्सने 217 धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाज गमावत 114 धावा केल्या. मात्र त्यानंतर त्यांनी 71 धावांमध्ये 7 फलंदाज गमावले. शेवटच्या षटकात नेदरलॅंड्सला विजयासाठी फक्त सहा धावांची गरज असताना नेपाळचा कर्णधार पारस खडका (1/24) याने गोलंदाजी करण्याची जबाबदारी घेतली. त्याने त्याच्या शेवटच्या षटकात फक्त चार धावा दिल्या. बरोबरीसाठी एक आणि विजयासाठी दोन हव्या असताना क्लासेन शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला आणि नेपाळने सामन्यात नाट्यमयरित्या विजय मिळवला. 

नेपाळ आणि नेदरलॅंड्स यांच्यातील एकदिवसीय मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटली. याच मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यात नेदरलॅंड्सने नेपाळवर 55 धावांनी विजय मिळवला होता. 

त्यापूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळची 88/5 अशा बिकट परिस्थिती असताना कर्णधार पारसने 69 चेंडूंमध्ये 51 धावा केल्या तर आठव्या क्रमांकावर आलेल्या सोमपाल कामीने 46 चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांसह  
61 धावा केल्या. 
    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepal wins its first ODI match against Netherlands