सलग तीन विकेट घेतल्या तरी "या" बॉलरची हॅटट्रीक नाही, हे आहे कारण..

सकाळ वृत्तसंस्था
Thursday, 9 January 2020

इंदौर: भारत आणि श्रीलंका दरम्यान झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. हा सामना भारताने सामना सात विकेट राखून सहजपणे जिंकला. शार्दूल ठाकूर याने भारताकडून सर्वोत्तम कामगीरी करत तीन विकेट घेतल्या तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांनी त्याला चांगली साथ दिली. 

शार्दूल जेव्हा त्याची चौथी ओव्हर टाकायला आला तेव्हा त्याच्या खात्यावर एकही विकेट नव्हती. १९ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर त्याने धनंजय डीसिल्वा याला बाद केलं आणि शेवटच्या दोन बॉलवर इसरु उदाना आणि लसिथ मलिंगा यांना बाद करत सलग दोन विकेट घेतल्या.

ज्या दोन बॉलवर शार्दूलला दोन विकेट मिळल्या ते त्याच्या स्पेलचे शेवटचे दोन बॉल होते. त्यामुळे आपल्याला  वाटू शकतं की तीसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात शार्दूलने जर का स्पेलच्या पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, तर त्याच्या नावावर हॅटट्रीक जमा होणार.पण तसं काही होणार नाही.

सर्वसाधारणपणे सलग तीन चेंडूवरती तीन विकेट घेतल्या गेल्या, तर त्याची नोंद हॅटट्रीक म्हणून केली जाते. जर एखादा गोलंदाजाने ओव्हरच्या शेवटच्या दोन्ही बॉलवर विकेट घेतल्या आणि त्याच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जर त्याला परत विकेट मिळाली तर ती सुध्दा हॅटट्रीक असते. 

पण जर गोलंदाजने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या दोन बॉलवर दोन विकेट घेतल्या आणि पुढच्या सामन्यात पहिल्या बॉलवर जर त्याला परत विकेट मिळाली, तर त्याची हॅटट्रीक म्हणून नोंद केली जात नाही असा नियम आहे. हॅटट्रीक होण्यासाठी तीनही विकेट एकाच सामन्यात घेतल्या गेल्या पाहिजेत. या नियमामुळेच जरी शार्दुल ठाकूरने पुण्याच्या मॅचमध्ये त्याच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली तरी त्याची हॅटट्रीक होणार नाही.

याआधी ट्वेंटी20 सामन्यात हॅटट्रीक घेण्याची कमाल भारताकडून दिपक चहरने बांग्लादेश विरोधात केली आहे. ती आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 सामन्यात कुठल्याही भारतीयाकडून घेतली गेलेली ती पहीली हॅटट्रीक होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 in 2 in final over but Shardul Thakur will not be on a hat trick in Pune