ऑस्ट्रेलियन मीडिया देणार गेलला 3 लाखांची नुकसान भरपाई

वृत्तसंस्था
Tuesday, 4 December 2018

वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या प्रतिमेवर डाग लावल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाच्या फेअरफॅक्स मीडिया कंपनीविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला होता.

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या प्रतिमेवर डाग लावल्याचे सांगत ऑस्ट्रेलियाच्या फेअरफॅक्स मीडिया कंपनीविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात फेअरफॅक्स कंपनीला गेलला 3 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहेत. न्यू साऊथ वेल्स सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश लुसी मॅक्कलम यांनी हे आदेश दिले आहेत. 

फेअरफॅक्स मीडिया कंपनीने 2015ची विश्वकरंडक स्पर्धा सुरु असताना सिडनी येथील सामन्यात मसाज थेरेपिस्टसमोर अशोभनीय कृत्य केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे माझ्या प्रतिमेवर डाग लागला असे सांगत त्याने या कंपनीवर हा दावा ठोकला होता. मात्र, या निर्णयाविरोधात फेअरफॅक्स मीडिया कंपनी दाद मागणार आहे. 

फेअरफॅक्स मीडिया कंपनीने त्यांच्या वृत्तपत्रांमधून ख्रिस गेलवर अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात ऑक्टोबर 2017 मध्ये चार सदस्यीय ज्युरींनी गेलच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर आता न्यू वेल्स सर्वोच्च न्यायालयानेही गेलच्याच बाजूने निर्णय दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australian media to pay 3 lakh to chris gayle