'फिका'ला संघटनेत हवेत आजी क्रिकेटपटू

वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची अधिकृत संघटनेने (फिका) भारतीय क्रिकेपटू संघटनेच्या (आयसीए) स्थापनेचे स्वागत केले आहे.

- मात्र, त्याचवेळी त्यांनी संघटनेनेमध्ये आजी क्रिकेटपटूंचा समावेश असावा असे मत मांडले आहे. 

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची अधिकृत संघटनेने (फिका) भारतीय क्रिकेपटू संघटनेच्या (आयसीए) स्थापनेचे स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी संघटनेनेमध्ये आजी क्रिकेटपटूंचा समावेश असावा असे मत मांडले आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारीच "आयसीए'च्या स्थापनेस मान्यता दिली होती. मात्र, त्यांनी संघटनेत केवळ माजी क्रिकेटपटूच असतील अशी अट टाकली होती. संघटनेची पहिली निवडणूक होईपर्यंत त्यांनी कपिलदेव, अजित आगरकर, शांता रंगास्वामी यांची संचालक म्हमून नियुक्ती केली होती. 

मात्र, "फिका'चे कार्याध्यक्ष टोनी आयरिश यांनी "आयसीए'मध्ये आजी क्रिकेटपटूंचा समावेश असावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले,"भारतात क्रिकेटपटूंच्या संघटनेला मान्यता मिळाली हा स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र, संघटनेत केवळ माजी क्रिकेटपटूंना स्थान मिळेल ही त्यांची अट आम्हाला समजलेली नाही. क्रिकेट विश्‍वात कार्यरत असलेल्या क्रिकेटपटूंच्या संघटनेत आजी खेळाडूंचा समावेश आहे. माजी खेळाडूंचा समावेश करण्याच्या अटीनुसार भारतात खेळत असलेले सुमारे 600 क्रिकेटपटू संघटनेच्या सदस्यत्वापासून मुकणार आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FICA wants current players in ICA