भारताच्या धडाकेबाज सलामीवीराचे 42 वर्षात पदार्पण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

भारतीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज अशी ओळख असणा-या विरेंद्र सेहवागचा आज वाढदिवस असून त्याने आज 42 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज अशी ओळख असणा-या विरेंद्र सेहवागचा आज वाढदिवस असून त्याने आज 42 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विरेंद्र हा क्रिकेटच्या मैदानानंतर सध्या सोशल मीडियावर ही तशीच धडाकेबाज बॅटिंग करत असून त्याच्या चाहत्यांनी ही सोशल मीडियावर आपल्या लाडक्या विरूवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.

1999 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर विरेंद्रने 2013 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या दरम्यान त्याने 251 एकदिवसीय सामन्यात 8 हजाक 273 धावा केल्या असून यात 15 शतकांचा तर 38 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्याने 104 कसोटी सामन्यांत 8 हजार 586 धावा केल्या असून यात 23 शतकांचा तर 32 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोनही प्रकारात इतकी उत्तम कामगिरी करणारा सेहवाग या जगातील एकमेव फलंदाज आहे. याशिवाय सेहवाग वेळप्रसंगी फिरकी गोलदांजी देखील करत होता. 

अशा या भारताच्या धडाकेबाज सलामीवीराला चाहते वेगवेगळ्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असून यात विशेष नाव हे 'मिस्टर ट्रिपल सेन्चुरियन' हे देण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा विरेंद्रने त्रिशतक झळकावले असल्यानेच चाहत्यांनी त्याला हा किताब दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian batsman virendar sehwag turns 41 today