INDvsWI : बस राव, एक तर पाऊसच पडावा नाहीतर पूर्ण खेळ व्हावा

वृत्तसंस्था
Saturday, 10 August 2019

वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पाणी पडल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली हताश झाला. "एक तर पावसामुळे सामनाच रद्द व्हावा किंवा पूर्ण खेळ व्हावा. पावसाचा व्यत्यय हा क्रिकेटमधील सर्वाधिक निराशाजनक भाग होय,' अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.

प्रॉव्हिडन्स (गयाना) -  वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर पाणी पडल्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली हताश झाला. "एक तर पावसामुळे सामनाच रद्द व्हावा किंवा पूर्ण खेळ व्हावा. पावसाचा व्यत्यय हा क्रिकेटमधील सर्वाधिक निराशाजनक भाग होय,' अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. 

पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला. नंतर अनुकूल कौल लागल्यावर विराटने वेस्ट इंडीजला फलंदाजी दिली. 13 षटकांत 1 बाद 54 धावा झाल्या असताना पाऊस आला. त्यानंतर खेळच झाला नाही. 

विराट म्हणाला, "पावसामुळे मैदान निसरडे होते. त्यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याचा धोका असतो. खेळ थांबवावा लागणे, मग पुन्हा सुरू होणे अशा प्रकारे खेळावे लागते तेव्हा कधीच छान वाटत नाही. जेवढे जास्त व्यत्यय येतात तेवढी तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागते.' 

विंडीजमधील खेळपट्ट्यांबद्दल तो म्हणाला की, "काही ठिकाणी चेंडू वेगाने येतो व उसळतो. त्यावेळी मोठे आव्हान असते. तेथे तुमची कसोटी लागते. काही खेळपट्ट्या संथ असतात. तेव्हा तुम्हाला संयम बाळगावा लागतो.' मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: INDvsWI The Indian captain Virat Kohli comments