esakal | अंपायरने आधी दिला वाईड बॉल, नंतर लगेच दिले आऊट; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Ireland Womens Super 50 Series Umpire signals wide reverses their decision to out See Viral Video

महिला सुपर 50  सरिज (Womens Super 50 series)मध्ये अंपायरने आधी वाईड बॉल दिला त्यानंतर अंपायरने अचानक बोट वर करून फलंदाज बाद झाल्याचे जाहीर केले. (Umpire signals wide reverses his decision to out) सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अंपायरने आधी दिला वाईड बॉल, नंतर लगेच दिले आऊट; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : महिला सुपर 50  सरिज (Womens Super 50 series)मध्ये अंपायरने आधी वाईड बॉल दिला त्यानंतर अंपायरने अचानक बोट वर करून फलंदाज बाद झाल्याचे जाहीर केले. (Umpire signals wide reverses his decision to out) सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयरलँड क्रिकेट बोर्डाकडून (Ireland Cricket Board) देशातील नवोदित महिला क्रिकेटर्सना प्रोत्साहित करण्यासाठी महिला सुपर 50 मालिकेचे (Womens Super 50 series)आयोजन करण्यात आले आहे. या सिरिजमधील एका सामन्यात एक अजबच घटना घडली आहे. अंपायरने गोलंदाजाचा लेगस्टंप सोडून बाहेर जाणारा चेंडू पहिल्यांदा वाईड दिला. त्यानंतर क्षेत्ररक्षक खेळाडूंनी फलंदाज बाद असल्याचे अपिल केले. त्यानंतर मात्र, अंपायरने मध्येच आपला निर्णय बदलत त्या फलंदाजाला बाद असल्याचे घोषित केले. अंपायरच्या या निर्णयाने सर्वचजण चकित झाले.

एलएन मैकार्थी या महिला गोलंदाजाच्या चेंडूवर टाइफून संघाची कर्णधार लौरा डेनेलीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू लेग स्टंपला चुकवत यष्टीरक्षकाच्या हातात गेला. गोलंदाजाने झेलबादसाठी जोरदार अपिल केले, परंतु अंपायरने हाताचा इशारा करत चेंडू वाईड असल्याचे सांगितले होते. त्यानंतर फलंदाज लौरा तंबूकडे परतण्यास निघण्याच्या तयारीत असताना तिने अंपायरकडे पाहिले तर अंपायरनी मोबाईल चेंडू वाईड असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे लौरा जाग्यावरच थांबली. मात्र, त्यानंतर अंपायरने आपला निर्णय बदलून लौराला आऊट दिल्याने सर्वचजण चकित झाले.

दरम्यान, एकदिवसीय सामन्याची सुरुवात ३ ऑगस्ट झाली असून टाइफून संघाने स्कॉचर्सविरुद्ध सात गडी राखून विजय मिळविला आहे. हा सामना ओक हिल क्रिकेट क्लबमध्ये खेळला गेला आहे. स्कॉचर्स संघाने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग टाइफून संघाने आरामात केला.