esakal | INDvsWI : मै अपने मन का राजा; मग आता दंडही भरा
sakal

बोलून बातमी शोधा

Kieron Pollard fined for misbehaving with umpire

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू किएरॉन पोलार्ड याला पंचांचा अनादर केल्याबद्दल सामन्याच्या मानधनातील 20 टक्के दंड करण्यात आला असून, एक दोषांकही त्याच्या नावावर नोंदविण्यात आला आहे.

INDvsWI : मै अपने मन का राजा; मग आता दंडही भरा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई : वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू किएरॉन पोलार्ड याला पंचांचा अनादर केल्याबद्दल सामन्याच्या मानधनातील 20 टक्के दंड करण्यात आला असून, एक दोषांकही त्याच्या नावावर नोंदविण्यात आला आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पोलार्डने मैदानाबाहेर येण्यासाठी राखीव खेळाडूची मागणी केली. अर्थात यासाठी त्याने पंचांची परवानगी मागितलेली नव्हती. पंचांनी त्याला परवानगी मागण्याची विनंती केली आणि त्यानंतर पुढचे षटक संपेपर्यंत वाट पाहण्यास सांगितले. मात्र, पोलार्डने पंचांची यापैकी एकही सूचना पाळली नाही. त्याचबरोबर त्याने आपल्यावरील आरोपही फेटाळून लावले आणि आयसीसी निरीक्षकांसमोर चौकशीसाठी येण्यासही नकार दिला. त्यामुळे आयसीसीच्या आचारसंहितेच्या 2.4 नियमाचा त्याने भंग केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवून आयसीसी निरीक्षक जेफ क्रो यांनी त्याच्यावर कारवाई केली.