Kolhapur Cricket: कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान; सतेज पाटलांकडून 2 कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satej Patil

कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे शास्त्रीनगर मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान तयार होणार आहे.

कोल्हापुरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान; 2 कोटींच्या निधीची घोषणा

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur)लवकरच शास्त्रीनगर (Shastrinagar) मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे (International Cricket) क्रिकेट सामने पाहायला मिळणार आहेत. सहा एकरहून अधिक क्षेत्रफळ असणाऱ्या या मैदानाला आज पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी २ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. आज शास्त्रीनगर (Shastrinagar) येथे तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाला भेट दिली यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे (Kolhapur Municipal Corporation) शास्त्रीनगर मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान तयार होणार आहे. यामध्ये सात इंटरनॅशनल विकेट, तर्फ ग्राउंड, ऑस्ट्रेलियन लॉन, दिवसरात्र सामने खेळण्यासाठी लाईटची अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मैदानाच्या चाचणीसाठी सराव सामना खेळविण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यासह कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासोबत सतेज पाटलांनी क्रिकेट खेळण्याची आनंद लुटला.

यावेळी सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला साजेसे आणि क्रीडा वैभवामध्ये भर घालणाऱ्या या मैदानाच्या विकासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत.

हेही वाचा: कोहलीसह पंतची सुट्टी; आता तरी ऋतूराजला संधी मिळणार?

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, विद्यमान अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, काकासाहेब पाटील,अभिजीत भोसले, जनार्दन यादव, संभाजी जाधव, संजय पठारे, संजय मोहिते, सुरेश ढोनुक्षे, यांच्यासह निवड चाचणीत सहभागी झालेले खेळाडू यावेळी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur International Cricket Ground 2 Crore Fund From Satej Patil Sport News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..