
कोहलीसह पंतची सुट्टी; आता तरी ऋतूराजला संधी मिळणार?
वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील अर्धशतकवीर विराट कोहलीसह (Virat Kohli) रिषभ पंत (Rishabh Pant) ला बीसीसीआयने सुट्टी दिली आहे. त्यामुळे ही जोडी वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासह श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला उपलब्ध राहणार नाहीत. विराट कोहलीनं तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी ब्रेक मागितला होता. त्याच्यासोबत पंतलाही ब्रेक देण्यात आला आहे. दोघांनाही बायोबबलमधून 10 दिवसांची सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
भारतीय संघाने (Team India) वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सलग दोन विजयासह मालिका खिशात घातली आहे. तिसऱ्या कसोटीत पाहण्यांना व्हाईट वॉश करण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरेल. विराट कोहली (Virat Kohli )आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या अनुपस्थितीत भारतीय प्लेइंग 11 मध्ये दोन बदल पाहायला मिळतील. यात ऋतूराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळू शकते. वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत ऋतूराज गायकवाड टीम इंडियाचा भाग होता. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला एकही सामना खेळता आला नाही.
हेही वाचा: बिजींग IOC अधिवेशनात नीता अंबानी; CM उद्धव ठाकरेंचा खास मेसेज
लोकेश राहुल,वाशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेतून माघार घेतल्यानंतर ऋतूराज गायकवाडला टी-20 संघात स्थान मिळाले. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. फलंदाज म्हणून दोन्ही सामने खेळलेला इशान किशन पुढील सामन्यात विकेट्स मागची जबाबदारी पार पाडताना दिसू शकेल. त्याच्याशिवाय ऋतूराज गायकवाड रोहितसोबत डावाला सुरुवात करणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा: घरची ओढ; किंग कोहली बायोबबलमधून पडला बाहेर
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रविवारी 20 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) चे स्थान पक्के मानले जात आहे. त्यालाही पहिल्या दोन्ही सामन्यात संधी मिळालेली नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 24 फेब्रुवारी (लखनऊ)
दुसरा टी20 सामना : 26 फेब्रुवारी (धर्मशाला)
तिसरा टी20 सामना : 27 फेब्रुवारी (धर्मशाला)
पहिला कसोटी सामना : 4 ते 8 मार्च (मोहाली)
दुसरा कसोटी सामना (डे-नाइट) : 12 से 16 मार्च (बंगळुरु)
Web Title: Virat Kohli Rishabh Pant On Break Ruturaj Gaikwad And Shreyas Iyer Chance Against West Indies And Srilaka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..