माझ्या विश्वकरंडकातील उत्तम कामगिरीचे श्रेय युवी पाजींना - शुभमन गिल

Yuvraj-and-Shubhman
Yuvraj-and-Shubhman

मुंबई : नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील विश्वकरंडकाचा मालिकावीर शुभमन गिल याने त्याच्या उत्तम कामगिरीचे श्रेय अनुभवी व वरिष्ठ खेळाडू युवराजसिंगला दिले आहे. युवराजच्या मार्गदर्शनामुळे व पूर्वी दिलेल्या टिप्समुळे आपण चांगले खेळू शकलो असे मत शुभमनने व्यक्त केले.  

बंगळुरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असताना युवी पाजीने मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मला मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, माझ्यासोबत फलंदाजीचा सराव देखील केला होता, अशा आठवणी त्याने व्यक्त केल्या.   

भारताने चौथ्यांदा 19 वर्षाखालील विश्वकरंडकावर आपले नाव कोरले. 18 वर्षीय गिलने या विश्वकरंडकात तीन अर्धशतके व एक शतक झळकावले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना गिल म्हणाला की, प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला शेवटपर्यंत खेळण्याचा सल्ला दिला. "पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासात दबाव होता. आमच्या सलामीवीर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मधल्या फळीपर्यंत खेळ चांगला झाला. त्याच दरम्यान आमचे काही बळी  गेले. पण राहुल सरांनी सांगितल्याप्रमाणे शेवटपर्यंत खेळलो. यावेळी अनुकूल रॉयसोबतच्या भागीदारीमुळे विजय मिळवता आला. 

विश्वकरंडकाच्या दणदणीत विजयानंतर व सामनावीराचा मान मिळवल्यानंतर, आता शुभमन गिल आगामी आयपीएलसाठी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com