esakal | श्रीलंका भारतावर आघाडी घेण्याच्या तयारीत
sakal

बोलून बातमी शोधा

Cheteshwar_Pujara Kolkata Test 2017

दिलरुवान परेराने तिसऱ्या दिवशी भारताच्या एकमात्र फलंदाज रविंद्र जडेजा आणि वृद्धीमान सहाला बाद करुन दुहेरी विकेटस् घेतल्या. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली

श्रीलंका भारतावर आघाडी घेण्याच्या तयारीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यावर श्रीलंका पकड घेईल, अशी लक्षणे दिसत आहेत. भारताचा डाव 172 धावांत संपुष्टात आणल्यानंतर श्रीलंकेने अखेरची बातमी हाती आली तेव्हा चार बाद 164 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचे अजून सहा फलंदाज बाद व्हायचे बाकी असून त्यांना भारतावर आघाडी घेण्यासाठी अवघ्या आठ धावांची आवश्यकता आहे. 

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 172 धावांतच संपुष्टात आला. श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने भारताच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले. दासून शनाका दिलरुवान परेराने आणि लाहिरु गमगे या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

दिलरुवान परेराने तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजा आणि वृद्धिमान साहाला बाद केले. भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. वृद्धिमान साहा आणि जडेजाने सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी करत श्रीलंकेचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेच्या प्रभावी माऱ्यासमोर भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजाराच्या संयमी 52 धावांच्या खेळीचा शेवट रंगना हेरथच्या एका अप्रतिम चेंडूवर झाला.