श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून दणदणीत विजय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 December 2017

धरमशाला : धरमशाला येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने 7 गडी राखून भारताला पराभूत केले. श्रीलंकेने तीन सामान्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 112 धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने आवश्यक आव्हान 20.4 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. 

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीमुळे भारतीय संघ अवघ्या 112 धावांत गारद झाला. महेंद्रसिंह धोनीने केलेल्या 65 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या दूर राहिला. सुरंगा लकमलने चार बळी मिळविले.

श्रीलंकेचा कर्णधार थिसरा परेराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सुरंगा लकमल आणि अँजेलो मॅथ्यूज यांनी हा निर्णय अगदी सार्थ ठऱविला. शिखर धवनला मॅथ्यूजने आणि कर्णधार रोहित शर्माला लकमलने बाद केले. त्यानंतर भारतीय फलंदाज धावा जमाविण्यात अपयशी ठरले. त्यामुऴे खेळाडूंवर दबाव वाढत गेला. वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयश अय्यरने काही काळ संघर्ष केला. पण, तोही जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. दिनेश कार्तिक, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार हे संघाच्या अवघ्या 27 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national sports India vs sl 1st one day live updates india loses early wickets