'अंडर 19 वर्ल्डकप' ; भारताचा बांगलादेशवर 131 धावांनी विजय

वृत्तसंस्था
Friday, 26 January 2018

यापूर्वी भारताने बांगलादेशला पराभूत केले होते. त्यामुळे या विश्वचषकातील सलग चौथा विजय साजरा केला. या सामन्यात भारताने 266 धावा काढत बांगलादेशला आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघाचे आव्हान बांगलादेशाला पेलता आले नाही. 266 धावांचे लक्ष्य त्यांना न पेलता आल्याने 134 धावांवर त्यांनी डाव आटोपला. 

वेलिंग्टन : भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा 131 धावांनी धुव्वा उडवत 19 वर्षांखालील विश्वचषक उपांत्य फेरीत धडक मारली. आता या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पाकिस्तानशी सामना होणार आहे. 30 जानेवारी (मंगळवार) रोजी हा सामला रंगणार आहे.

यापूर्वी भारताने बांगलादेशला पराभूत केले होते. त्यामुळे या विश्वचषकातील सलग चौथा विजय साजरा केला. या सामन्यात भारताने 266 धावा काढत बांगलादेशला आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघाचे आव्हान बांगलादेशाला पेलता आले नाही. 266 धावांचे लक्ष्य त्यांना न पेलता आल्याने 134 धावांवर त्यांनी डाव आटोपला. 

भारतीय संघातील कमलेश नागरकोटीने 3 तर शिवम मावी आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तसेच शुभमन गिलने 86, अभिषेक शर्माने 50, पृथ्वी शॉने 40 तर हार्विक देसाईने 34 धावा करत भारताला सर्व बाद 265 धावांची मजल मारून दिली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news National Sports U19 World Cup India set up semis clash with Pakistan with thumping win