माजी कॅप्टनचा सन्मान; किवींनी केली व्हिटोरीची जर्सी निवृत्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी माजी कर्णधार डॅनिएल व्हिटोरीची 11 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

वेलिंग्टन - न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी माजी कर्णधार डॅनिएल व्हिटोरीची 11 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून त्याने केलेल्या कामगिरीचा आदर म्हणून हा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही, तर न्यूझीलंडकडून दोनशेहून अधिक सामन्यात प्रतिनिधीत्व केलेल्या प्रत्येक खेळाडूची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने ट्‌विट केले आहे. त्याचवेळी न्यूझीलंड क्रिकेटने कसोटी क्रिकेटसाठी आपल्या संघातील खेळाडूंना जर्सी क्रमांकही दिले. त्यांची श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NYZ retires Daniel Vettori jersey no.11