World Cup 2019: माझ्यासाठी विश्‍वकरंडक स्पर्धा अजून संपलेली नाही : शिखर

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्‍चर झाले म्हणजे माझ्यासाठी विश्‍वकरंडक स्पर्धा संपली असे होत नाही. मी केवळ तीन सामने खेळू शकणार नाही, अशी जबरदस्त इच्छाशक्ती शिखर धवन याने व्यक्त केली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्‍चर झाले म्हणजे माझ्यासाठी विश्‍वकरंडक स्पर्धा संपली असे होत नाही. मी केवळ तीन सामने खेळू शकणार नाही, अशी जबरदस्त इच्छाशक्ती शिखर धवन याने व्यक्त केली आहे. 

अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर तीन आठवडे खेळू शकणार नाही. तीन आठवडे खूप वाटत असले, तरी स्पर्धा त्याहून पुढे चालू राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी धवन न्यूझीलंड (ता. 13), पाकिस्तान (ता. 16) आणि अफगाणिस्तान (ता. 22) हे तीन सामने खेळू शकणार नाही. अंगठ्याची दुखापत झेलूनच शिखर त्या दिवशी शतकी खेळी खेळला, यावरूनच त्याची जिगरबाज वृत्ती दिसून येते. तीन आठवड्याची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असली, तरी त्याने कच खाल्ली नाही. स्पर्धेचा कालावधी मोठा आहे. प्रत्येक सामन्यामध्ये विश्रांतीचा कालावधी देखील योग्य आहे. त्यामुळे आपण केवळ तीन सामनेच खेळू शकणार नाही, असे धवन म्हणाला.

आपली खेळण्याची भावना स्पष्ट करताना त्याने "कबी मेहेक की तरह हम गुलों से उडते हैं, कभी धुये की तरह हम पर्वतो से उडते है, ये कैचीयां हमे इन उडने से खाक रोकेगी, के हम परो से नही हौसलो से ही उडते है...'ही उर्दु कविताच "ट्‌विट' केली आहे. यावरूनच विश्‍वकरंडक खेळण्याची शिखरची जबरदस्त इच्छाशक्ती स्पष्ट होते.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shikhar Dhawan hints his World Cup ain't over yet