esakal | Video : पिक्चर अभी बाकी हैं!  युजवेंद्रने शेअर केला लग्नाचा टीझर
sakal

बोलून बातमी शोधा

yuzvendra chahal and dhanshree verma releases teaser

या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याची एक सुंदर झलक दाखवण्यात आली आहे.

Video : पिक्चर अभी बाकी हैं!  युजवेंद्रने शेअर केला लग्नाचा टीझर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने काही महिन्यांपूर्वीच नृत्यदिग्दर्शिका धनश्रीसोबत लग्नगाठ बांधली. गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टध्ये पारंपरिक हिंदू रिवाजाप्रमाणे या दोघांचा लग्नसोहळा पार पाडला. खरं तर, धनश्री -युजवेंद्रच्या लग्नाला आता बराच काळ उलटून गेला आहे. मात्र, तरीदेखील त्याच्या लग्नाविषयीच्या चर्चा अद्यापही सुरु आहेत. यामध्येच धनश्री आणि युजवेंद्रने त्यांच्या लग्नाचा एक टीझर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याची एक सुंदर झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा लग्नाचा टीझर तुफान व्हायरल होत आहे.  विशेष म्हणजे हा व्हिडीओ केवळ व्हायरलच होत नाहीये. तर, त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरुन वर्षाव होत आहे. 

युजवेंद्रने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या हळदी सोहळ्यापासून ते लग्नच्या रिसेप्शन पार्टीपर्यंत प्रत्येक सोहळ्याची एक लहानशी झलक दाखवण्यात आली आहे.  मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला क्रीडाविश्वातील काही दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे लग्नातील संगीत सोहळ्यात युजवेंद्रचा हटके अंदाज पहिल्यांदाच साऱ्यांना पाहायला मिळाला.

युजवेंद्रने शेअर केलेल्या टीझरला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत असून या लग्नाचा संपूर्ण व्हिडीओ २७ तारखेला प्रदर्शित होणार आहे. तू माझी आहे, मी तुझा आहे आणि माझं तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे, असं कॅप्शन युजवेंद्रने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान,  काही दिवसांपूर्वीच ही जोडी मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करायला गेली होती. या व्हेकेशनमधील अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. धनश्री हे कोरिओग्राफर असून लॉकडाउन काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि चहलने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर कुटुंबाच्या संमतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
 

loading image