धक्कादायक! डीएसपीकडून 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, पत्नीही द्यायची साथ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Assam Crime News: डीएसपीवर पॉक्सो सहीत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
assam dsp kiran nath arrested
assam dsp kiran nath arrestedsakal

Crime News : आसामच्या डेरगाव येथे 15 वर्षाच्या घरकाम करणाऱ्या नोकरीणीवर अतीप्रसंग केल्या प्रकरणी सीनियर पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यावर आरोप आहे की, ट्रेनिंग कॉलेजमध्ये पोस्टिगवर असताना या अधिकाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. ती मुलगी याच डीएसपीच्या घरात घरकाम करत होती. संबंधित डीएसपीचे नाव किरण नाथ आहे. डीएसपीवर पॉक्सो सहीत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Protection of Children from Sexual Offences Act)

assam dsp kiran nath arrested
Assam Agitation : आसाममध्ये आंदोलनाचा भडका

डीएसपी किरण नाथ याच्या विरोधात आय़पीसी 376, 506, आणि पॉक्सो सेक्शन 6 चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (POCSO)

त्या मुलीच्या घरच्यांनी गोलाघाट जिल्ह्यातील डेरगांव पोलिस स्टेशन मध्ये एफआय़आर दाखल केली होती. यावेळी कुटुंबियांनी मिडियाला माहिती दिली की,ती मुलगी डीएसपीच्या घरातुन पळून आपल्या घरी पुन्हा आली. यावेळी तिने आपल्या कुटुंबियांना सर्व माहिती दिली.या नंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. (Latest Marathi News)

assam dsp kiran nath arrested
Assam govt scheme: '3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी मदत मिळणार नाही', आसामच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

आसामचे डीजीपी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी रविवारी सोशल मीडियावरुन माहिती दिली.यावेळी पुराव्याच्या आधारे डीएसपी किरण नाथला अटक करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. डेरगाव येथील लशीत बोरफुकन पोलीस अकादमीत तैनात असलेल्या डीएसपीवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेही ते म्हणाले. यावेळी झिरो टॉलरेंस नीति नुसारच काम केले जाईल असेही डीजीपी म्हणाले. (Indian Crime News)

यावेळी अल्पवयीन मुलीने आरोप लावला आहे की, अत्याचार करण्यात त्याची पत्नीपण त्याची साथ द्यायची. महिला असल्याने तिने मुलीला पाठिंबा द्यायला हवं होतं, मात्र तिने पतीचे कृत्य लपवून गप्प बसल्याचे पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे.(Assam Latest News )

assam dsp kiran nath arrested
Assam Government : आसाममध्ये लवकरच बहुपत्नीत्वावर बंदी घालणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com