Maharashtra crime news
esakal
बीड : नात्याच्या मर्यादा ओलांडणाऱ्या एका प्रेमसंबंधाचा धक्कादायक, दुर्दैवी शेवट झाल्याची घटना केज आणि अंबाजोगाई परिसरात उघडकीस आली. बदनामीच्या भीतीने २१ वर्षीय मुलाने विष प्राशन करून जीवन संपविले. हा धक्का सहन न झाल्याने त्याच्या सावत्र आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल साहेबराव पवार (वय २१) आणि अनिता साहेबराव पवार (दोघे रा. सोनी जवळा, ता. केज) अशी मृतांची नावे आहेत.