Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Chilli Powder Attack and Robbery: छत्रपती संभाजीनगर येथे केटरिंग व्यावसायिकाला मिरची पूड टाकून मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली; ऑर्डरच्या बहाण्याने बोलावून आरोपींनी रोख रक्कम आणि दागिने लुटत पसार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: एका केटरिंग व्यावसायिकाला वास्तुशांतीच्या जेवणाची ऑर्डर द्यायच्या बहाण्याने बोलावले. तेथे जाताच डोळ्यात मिरची पूड टाकून रॉडने मारहाण केली. यानंतर कानातील चार ग्रॅमच्या बाळ्या आणि ५५ हजार ९०० रुपये रोख लुटल्याची घटना सातारा परिसरातील प्रभू हॉटेलच्या मागे बुधवारी (ता. १८) घडली. याबाबत शनिवारी (ता. २१) सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com