Crime: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा

Sambhaji Nagar Crime: कापूस बियाणे हे अनधिकृत व शासन मान्यता प्राप्त नसल्याचे आढळून आले |
: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा
Crimesakal

Pachod Crime News: ऑनलाईन कापसाचे बियाणे उत्पादीत करणाऱ्या दोन कंपन्या व विक्री करणाऱ्या इसमांसह कुरियर चालक अशा एकूण चार जणां विरुद्ध कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून विविध कलमाखाली रविवारी (ता.दोन) पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट बियाण्याची तीस पाकीटे जप्त करण्यात आली आहेत.

यासंबधी अधिक माहिती अशी, पैठण पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक 'तथा' कृषी अधिकारी रामकृष्ण अरविंद पाटील (वय 54) यांना शनिवारी (ता. एक) प्रमोद वाल्मीक सातपुते रा. रांजणगाव दांडगा (ता.पैठण) हा इसम शासन मान्यता नसलेले, अनधिकृत व विनापरवाना कापूस बियाणे विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता कृषी अधिकारी राजकृष्ण पाटील यांनी या बाबीची खात्री करण्यासाठी पंचासमवेत पाचोड पोलिस ठाणे गाठून पोलिस कर्मचारी रविंद्र अंबेकर व अफसर बागवान यांना सोबत घेऊन यांना सोबत घेऊन रांजणगाव दांडगा येथे गेले असता प्रमोद सातपुते हा गट क्रमांक २८ मधील शेतवस्तीवर घरी राहत असल्याचे समजले.

: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा
Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्याचे 6 लाख लुटले; विंचूरला भरदिवसा घडला प्रकार

तेव्हा हे पथक त्याचे शेतवस्तीवर पोहचले असता त्यांचे घर बंद होते व तो घरी आढळून आला नाही. प्रमोद सातपुते घरी सापडून न आल्याने हे पथक पाचोड येथे परत आले व सायंकाळी सात वाजता हे पथक पुन्हा त्याचे घरी गेले असता प्रमोद सातपुते हा त्याचे शेतवस्तीवरील घरी सापडून आला. प्रमोद सातपुते यांस ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्याने राहत्या घरातून अनधिकृत विनापरवाना व शासन मान्यता नसलेलें कापूस बियाण्याचे वाण यांशी 5G ची एकूण १४ पाकिटे व शिवा गोल्ड-155 ची एकूण सहा पाकिटे असे एकूण २० पाकिटे बियाणे काढून दिले.

या बियाण्याच्या पाकिटांचे निरीक्षण केले असता या पाकिटांवर उत्पादक किंवा विपणन कर्ता यांचे नाव, सदर बियाण्याचे लॉट क्रमांक, वैध मुदत दिनांक, संपर्क क्रमांक व किंमत असा कोणताही मजकूर छापलेला आढळून आला नाही. यावरून सदर कापूस बियाणे हे अनधिकृत व शासन मान्यता प्राप्त नसल्याचे आढळून आले.

: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा
Nashik Crime News : कांदा व्यापाऱ्याचे 6 लाख लुटले; विंचूरला भरदिवसा घडला प्रकार

कृषी अधिकारी पाटील यांनी प्रमोद सातपुते यांस सदर कापूस बियाण्याबाबत विचारणा केली असता सदर बियाणे गावातील इसम दौलत पारसनाथ मंचरे यांच्याकडून १० पाकिटे ९७०० रुपये देऊन खरेदी केल्याचे व १० पाकिटे परेशकुमार अश्विनभाई पटेल रा. राजकोट (गुजरात) यांचे कडून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करून त्याचे ऑनलाईन रक्कम ९७०० रुपये 'फोन पे' द्वारे ता.२७ मे रोजी देऊन खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने प्रमोद सातपूते यास सोबत घेऊन गावातील दौलत मंचरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक २९ मधील शेतवस्ती वरील घरी गेले असता दौलत मंचरे हे तेथे सापडून आले.

कृषी अधिकारी श्री. पाटील यांनी दौलत मंचरेकडे या बियाण्याची चौकशी केली असता त्यांनी एकूण सात पॉकेटे वाण - यांशी 5G व शिवागोल्ड-१५५ या वाणाचे तीन पाकिटे असे एकूण दहा कापूस बियाणे पाकिटे घरातून काढून दिले. सदर बियाणे हे श्री परेशकुमार अश्विनभाई पटेल रा. राजकोट यांचे कडून ऑनलाइन पद्धतीने खरेदी करून त्याची रक्कम गुगल पे द्वारे १९४०१ रुपये गुगल पे द्वारे ता. सहा मे रोजी अदा केल्याचे सांगितले.

दौलत मंचरे व प्रमोद सातपुते यानी ऑनलाईन पद्धतीने मागविलेले एकूण ३० कापसाच्या बियाण्याची पाकिटे अंजनी कुरियर्स, जुने हेडगेवार हॉस्पिटल जवळ, छत्रपती संभाजीनगर मार्फत मिळाली होती.सदर पक्षकाने सातपुते यांचेकडील २० व मंचरेयांच्याकडील १० अशी एकूण तीस पाकीटे व त्या दोघांना घेऊन हे पथक पोलिस ठाण्यात आले.सदर बियाणे अनधिकृत व शासन मान्यता नसल्याने त्याचे नमुने घेण्यात आले.

: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा
Dhule Crime News : वकिलासह परिचारिकेचे घर फोडले! वडजाई येथील प्रकार; रोकडसह 2 लाखांचा ऐवज लंपास

कृषी अधिकारी रामकृष्ण पाटील यांच्या तक्रारीन्वये परेशकुमार अश्विनभाई पटेल , राजकोट( गुजरात) ,YANSHI - 5G Premium Hy.Cotton with new technology या बोगस कापूस बियाणे उत्पादन व विक्री करणारी अज्ञात कंपनी व अज्ञात व्यक्ती, शिवा गोल्ड 155 रिसर्च Hy. Cotton seeds या बोगस कापूस बियाणे उत्पादन व विक्री करणारी अज्ञात कंपनी व अज्ञात व्यक्ती , अंजनी कुरिअर, समर्थनगर, औरंगाबाद यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊन संबंधीत ऑनलाईन बियाणे मागविणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांना साक्षीदार करण्यात आले.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने व अनधिकृत बियाणे घेऊ नये असे आवाहन केले. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि शरदचंद्र रोडगे करित आहे.

: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा
Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

या गुन्हयात लावण्यात आलेली कलमे खालीलप्रमाणे : विनापरवाना बियाण्याची विक्री करणे बियाणे कायदा 1966 चे कलम 2,8,9 (11), 6 (ए) (बी), 7 (ए) (बी) (सी) (डी) चे उल्लंघन करणे , अनधिकृत HTBT कापूस बियाण्याची विक्री करणे हे बियाणे नियम 1968 चे कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13 चे उल्लंघन करणे.

बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील खंड 3, 4, 8, 18 चे उल्लंघन करणे , संशयित HTBT कापूस बियाणे पाकिटावर जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रोवल कमिटी (GEAC), च्या मान्यतेचे उल्लंघन करणे , पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 7 व 8 चे उल्लंघन करणे ,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3, 7, 8, 9, 10 चे उल्लंघन करणे , भारतीय दंड संहिता कलम ४२० चे उल्लंघन करून बोगस कापूस बियाणे व संशयित HTBT कापूस बियाण्याची बेकायदेशीररित्या विक्री करणे.

: कापूस बियाणांची ऑनलाईन विक्री पडली महागात,कंपनीसह कुरियर चालकावर गुन्हा
Nashik Cyber Crime: स्टॉक IPO अन्‌ शेअरवर बोनसमधून चिक्कार नफा! डॉक्टरला घातला तब्बल दीड कोटींना गंडा; सायबर भामट्यांचा प्रताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com