Faridabad Firing: धक्कादायक! कुत्र्याच्या विष्ठेवरून वाद; शेजाऱ्याने पिस्तुलातून झाडल्या १५ गोळ्या! टेक महिंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या

Parking dispute turns fatal in Faridabad: कुत्र्याची विष्ठा आणि गाडी पार्किंगवरून सुरू झालेल्या वाद थेट गोळीबारापर्यंत पोहचला; शेजाऱ्याने केलेल्या गोळीबारात टेक महिंद्राच्या बड्या अधिकाऱ्याचा मृत्यू
faridabad crime

faridabad crime - AI Image

esakal

Updated on: 

Faridabad: गाडी पार्किंग आणि पाळीव कुत्र्याच्या विष्ठेवरून सुरू झालेला वाद चक्क जिवावर बेतला. किरकोळ कारणांवरून सुरू झालेल्या या भाडंणामध्ये शेजाऱ्याने पिस्तुलातून थेट १५ गोळ्या झाडल्या आणि टेक महिंद्राचे आशिया विभागप्रमुख परमजीत धनखड यांची हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री हरियाणातील फरिदाबादमध्ये घडली आहे. आरोपी मोनू शर्मा गोळीबारानंतर संपूर्ण कुटुंबासह फरार झाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

Loading content, please wait...