आईसोबत वादानंतर घरातून बाहेर पडली, रस्त्यावर लिफ्टच्या बहाण्यानं सामूहिक अत्याचार; मारहाण करत धावत्या कारमधून रस्त्यावर फेकलं

Faridabad Rape Case : फरिदाबादमध्ये आईसोबत झालेल्या वादानंतर महिला घरातून एकटी बाहेर पडली. रात्रीच्या वेळी तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोघांनी कारमध्ये बसवलं. यानंतर मारहाण करत तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
Faridabad Woman Assaulted After Taking Lift From Unknown Men

Faridabad Woman Assaulted After Taking Lift From Unknown Men

Esakal

Updated on

Woman Gang-Raped In Faridabad : फरीदाबादमध्ये तीन तास धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीय. अत्याचार करणाऱ्यांनी क्रौर्याचा कळस गाठत तिला मारहाण केली. तिच्यावर अत्याचारानंतर कारमधून फेकून देण्यात आलं. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात ती फाटलेल्या कपड्यांमध्ये भेदरलेल्या अवस्थेत सापडली. आरोपींनी लिफ्ट देण्याच्या आमिषानं तिला कारमध्ये घेतलं. त्यानंतर मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले. रात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ पर्यंत तिच्यावर अत्याचार सुरू होते. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून कारही जप्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com