

Gay Dating App Honey Trap Case
esakal
Gay Dating App Fraud : गे-डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणाला जाळ्यात ओढून त्याच्याकडून ३१ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांच्या टोळीला अटक केली. गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे ही घटना घडली. लखतर तालुक्यातील एका तरुणाने गे-डेटिंग अॅप डाउनलोड करून काही जणांशी संपर्क साधला होता. परस्परांतील संवाद वाढल्यानंतर संबंधितांनी त्याला भेटीसाठी बोलावले. त्यानुसार तरुण सुरेंद्रनगर मेडिकल कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जन घरात पोहोचला.