Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Six Suspects Arrested in Hajgoli MD Drugs Case: मुंबई आणि बेळगावातून अर्थपुरवठा झाल्याचे तपासात समोर आले असून, सुमारे एक कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
Hajgoli MD Drugs Case

Hajgoli MD Drugs Case

esakal

Updated on

कोल्हापूर: हाजगोळी (ता. चंदगड) येथे एम.डी.ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर झालेल्या छापा कारवाईत सहा संशयितांना अटक करण्यात आली. पोल्ट्री मालक पप्पू मलतवाडकर (वय ३६, रा. सरोळी, ता. चंदगड) याच्यासह तौसिफ अब्दुल सत्तार कलानिया (वय ३५, रा. कुर्ला, मुंबई), मतीन मेहबूब डफेदार (वय ३०, रा. बेळगाव), मोहम्मद जाफर अली मेमन (वय ४०), शोएब शरीफ खान उर्फ नेपाळी (वय ३१, दोघे रा. माहीम, मुंबई), संतोष सदानंद बसरकट्टी (वय ३०, रा. तुडिये, चंदगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com