

Vidarbha News
esakal
जळगाव जामोद: तालुक्यातील राजुरा लघु प्रकल्पाजवळ शिरच्छेद झालेली मानवी कवटी व अर्धवट स्थितीत जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. मध्यप्रदेशातील जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या करून मुलाच्या मदतीने महिलेचे प्रेत जळगाव जामोद तालुक्यातील राजूर शिवारात जाळल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पिता - पुत्रास अटक केली आहे.
राजूर शिवारातील आसिफ हमीद मुल्लाजी यांच्या शेताजवळील नदी काठावर २६ एप्रिल रोजी अर्धवट जळालेली मानवी कवटी तसेच १०० मीटरच्या अंतरावर स्त्री जातीचे प्रेत मुंडके नसलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.