

PM Awas Scam Allegation in Jawala Murar Village, Complaint Filed
esakal
मुदखेड : तालुक्यातील जवळा मुरार ग्रामपंचायतीअंतर्गत प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेत लाभार्थी निवड, मंजुरी व निधी वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. गावपातळीवर घरकुल लाभार्थींची निवड करताना जाणीवपूर्वक अनेक लाभार्थींना वगळण्यात आले असून, अपात्र व्यक्तींना घरकुल मंजूर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम झालेले नाही, तरी घरकुलाचे बिले मंजूर करून कागदोपत्री रक्कम उचलण्यात आली.