

New residential housing projects reflecting the government’s fresh vision for urban development.
esakal
मुंबई महानगर प्रदेशाला ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करताना गृहनिर्माण, रोजगार आणि शाश्वत शहरीकरण यांना एकत्रित दिशा देणारे ‘व्हिजन-२०३०’ हेच भविष्यातील शहररचनेचे आधारस्तंभ ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘व्हिजन-२०३०’ अंतर्गत सुरक्षित, परवडणारा आणि रोजगाराशी जोडलेला निवारा उपलब्ध करून देण्याचा व्यापक आराखडा पुढे येत आहे.
‘व्हि जन-२०३०’ ही केवळ दीर्घकालीन उद्दिष्टांची रूपरेषा नसून भारताच्या शहरी भविष्यासाठीचा एक व्यापक विकासाचा नकाशा आहे. परवडणारे गृहनिर्माण, रोजगाराशी संलग्न निवास, शाश्वत शहरे आणि सामाजिक समावेशन हे घटक केंद्रस्थानी आहेत. मुंबईसारख्या जागतिक आर्थिक केंद्रासाठी व्हिजन-२०३० म्हणजे केवळ घरांची संख्या वाढवणे नव्हे, तर जीवनमान उंचावणारा, सुरक्षित निवारा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा होय.