Khambora Crime Case: खांबोरा येथे प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; ‘चोरांनी’ मारल्याचा बनाव करून मृतदेह आणला ठाण्यात

Youth Allegedly Attacked Over Love Affair: प्रेमसंबंधातून वाद झाल्यानंतर शैलैश तेलगोटे या २७ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. ‘चोरांनी मारहाण केली’ असा बनाव केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
Khambora Crime Case

Khambora Crime Case

esakal

Updated on

बाळापूर: प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा शेतशिवारात घडली. शैलैश श्रीकृष्ण तेलगोटे (वय २७, रा. पाळोदी) या तरुणावर लोखंडी रॉड व पेचकसाने हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘चोरांनी पकडून मारहाण केली’ असा बनाव करून गंभीर अवस्थेतील शैलैशला थेट उरळ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि प्रकरणाचा उलगडा झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com