esakal | पुणे : दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरुद्ध कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Story

पुणे : दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरुद्ध कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्तमनगर (uutamnagar)परिसरामध्ये विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून नागरिक, विक्रेते व व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (MPDA) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी या कारवाईचा आदेश दिला. (Location action against criminal spreading terror in Uttamnagar)

हेही वाचा: शंभर विद्यार्थ्यांनी पूर्ण केला ‘रिसर्च एथिक्स’चा अभ्यासक्रम

दिनेश किसन वांजळे (वय 21, रा. मराठी शाळेशेजारी, न्यु कोपरे, हवेली) असे कारवाई झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश वांजळे हा उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. वांजळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध वारजे माळवाडी व उत्तम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता, सुरा यांसारखी हत्यारे जवळ बाळगून खुनाचा प्रयत्न,जबरी दुखाबत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील सहा वर्षात वांजळेविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा: आळेफाटा : बसस्थानक बनले कचरा डेपो

त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे संबंधित परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडत होती. त्याच्यापासून जीवीतास व मालमत्तेचे नुकसान होईल, या भितीपोटी नागरिक त्याच्याविरुद्ध उघडपणे तक्रार देण्यात तयार होत नव्हते. उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी संबंधीत गुन्हेगाराविरुद्ध "एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पाठविला होता. त्यानुसार, पोलिस आयुक्त गुप्ता यांनी एक वर्षासाठी आरोपीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. दरम्यान, मागील दहा महिन्यात 31 गुन्हेगारांवर "एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

loading image
go to top