esakal | आळेफाटा : बसस्थानक बनले कचरा डेपो
sakal

बोलून बातमी शोधा

alephata

आळेफाटा : बसस्थानक बनले कचरा डेपो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : पुणे - नाशिक (pune -nashik) व अहमदनगर- कल्याण (ahmednagar-kalyan) महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आळेफाटा बसस्थानक (alephata stand) सध्या चक्क कचरा डेपो बनलेले आहे. येथे कोणीही यावे व मनसोक्तपणे कचरा टाकावा अशी स्थिती बघायला मिळत आहे. बसस्थानक प्रशासनाने तात्काळ कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे. (Garbage depot becomes bus stand alephata)

हेही वाचा: 'नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सर्वोतोपरी मदत करणार'

पुणे - नशिक व अहमदनगर - कल्याण महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण आळेफाटा बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथील स्थानिक ग्रामपंचायतीने वेळोवेळी येथील कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. ग्रामपंचातीकडे कचरा विल्हेवाट लावण्याची कोणतीही वेगळी सोय नसल्याने बऱ्याच वेळा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचतात. दिवसभर मोकाट कुत्रे कचरा चिवडत असतात. कचऱ्यावर पाऊस पडल्याने तो कुजला आहे. त्यातून दुर्गंधी सुटली आहे. दुर्गंधीचा त्रास केवळ प्रवाश्यांना नव्हे तर स्थानिक रहिवाशी, व्यापाऱ्यांनाही होत आहे. या बसस्थानकाचा नियोजनबद्ध विकास करून आळेफाट्याच्या सौंदर्यात भर घालावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: पेगॅसस बनवणारी कंपनी म्हणते, आमच्यामुळे लाखो लोक सुखाने झोपू शकतात

दरम्यान, बसस्थानक परिसरातील कचऱ्याच्या ढीगामुळे प्रवाशी, स्थानिक रहिवाशी, व्यापाऱ्यांनाही त्रास होत असून, रोगराई पसरण्याचाही धोका आहे. पावसाळा सुरु झाला असून परिसरात पाणी साचल्याने डेंगूची साथ पसरण्याचा धोका आहे. यामुळे लवकर हा परिसर स्वच्छ करावा, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा येथील स्थानिक ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गाने दिला आहे.

-राजेश कणसे

loading image
go to top