

Young Man Killed While Trying To Stop Cricket Ground Fight
Esakal
क्रिकेट खेळताना झालेला वाद सोडवायला गेलेल्या तरुणाचा बॅटने मारहाण झाल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मृत्यू झालेला तरुण हाउसिंग बोर्डात क्लार्क म्हणून कार्यरत होता. मध्य प्रदेशातील बैतूल इथं ही घटना घडलीय.