Solapur Human Trafficking: मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रात चक्क सुरू होता कुंटणखाना; २५ महिलांची सुटका, पाच जणांना अटक

Human Trafficking Bust at Swaranjali Art Center in Modnimb :मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्रात महिलांना वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने आणल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकून २५ महिलांची सुटका केली. मालक, मॅनेजर व चालक यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. तपास टेंभुर्णी पोलिस अधिकारी राहुल आत्राम करीत आहेत. ही कारवाई परिसरातील कला केंद्र चालकांसाठी धक्कादायक ठरली.
Solapur Human Trafficking

Solapur Human Trafficking

esakal

Updated on

टेंभुर्णी:मोडनिंब येथील स्वरांजली कला केंद्राचे मालक, मॅनेजर व कामगार हे परजिल्हा व परराज्यातून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. या कुंटणखान्यावर टेंभुर्णी ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी तथा परिविक्षाधीन आयपीएस राहूल आत्राम यांनी पोलिस पथकासह नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकून २५ महिलांची सुटका केली. या पथकाने रविवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com