Mother Kills 5-Year-Old Son Over Affair Fear
esakal
स्वत:च्या पाच वर्षांच्या मुलाची हत्या केल्या प्रकरणी न्यायालयाने एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जवळपास ३ वर्षांनंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ज्योती राठोड असं या महिलेचं नाव आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता विविध चर्चादेखील सुरु झाल्या आहेत. २०२३ मध्ये जतीन नावाच्या पाच वर्षांच्या मुलाचा घराच्या छतावरून कोसळून मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून हत्या असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.