Mumbai Crime: पत्नीच्या चारित्र्यावर संशय म्हणून पतीने चाकूने वार करुन केली हत्या

Mumbai News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय म्हणून पतीने चाकूने वार करुन केली हत्या
Mumbai News crimesakal

Mumbai Crime : मालवणीत पत्नीची पतीकडून चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. सपना श्रवण राऊत असे या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पती श्रवण राऊतला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रवण हा त्याची पत्नी सपना आणि तीन मुलांसोबत मालाडच्या मालवणी, पटेलवाडीत राहत होता.

Mumbai News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय म्हणून पतीने चाकूने वार करुन केली हत्या
Crime News: कल्याण जवळ दुकानात सापडला ४ कोटींच्या एमडीचा साठा

तो सपनाच्या चारित्र्यावरून संशय घेत होता, त्यातूनच गेल्या दोन-तीन दिवसांपासून या दोघांमध्ये सतत खटके उडत होते. आज (ता. ४) सकाळी पावणेबारा वाजता सपना बाथरूममध्ये गेली होती. त्यावेळी श्रवणने पत्नीवर चाकूने वार केले होते. त्यामध्ये ती गंभीररीत्या जखमी झाली होती.

ही घटना पोलिसांनी समजताच घटनास्थळी जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत सपना यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर काही काळातच पती श्रवणला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mumbai News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय म्हणून पतीने चाकूने वार करुन केली हत्या
Crime News: शौचास गेलेल्या 13 वर्षीय दलित मुलीस शेतात जिवंत जाळले, पोलीस काय म्हणाले?

मालवणी येथून बीट मार्शल आंबेकर, जाधवर यांनी चौकशीसाठी पतीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने घडलेली घटना सांगितली. यावेळी त्यांनी आपण स्वतःच पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com